वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

देव देवी देवतार्चन |

🙏 4. संत नामदेव · ABH-082556 · अभंग क्र. १७४६

1746.
देव देवी देवतार्चन | तूंचि माझे पूर्णपण ॥१॥
न मगे न मगे विठ्ठला | येथूनिया राहे उगला ॥२॥
जप तप नेम निष्ठा | तुजचि जाणो गा वैकुंठा ॥३॥
तुझी भक्ति हेचि गोड | आणिक नाही आम्हा चाड ॥४॥
यज्ञ याग मंत्र तंत्र | तूंचि आमचे कुळ गोत्र ॥५॥
येथुनि पंढरिये हरी | आम्हांसि तू अंगिकारी ॥६॥
आम्ही करितो कीर्तन | तारावे हे तुम्ही जन ॥७॥
हेंचि मागणे हो देवा | नामा म्हणे द्यावी सेवा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग