वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

तुझे चरणी सुख अनुपम्

🙏 4. संत नामदेव · ABH-082586 · अभंग क्र. १७४८

1748.
तुझे चरणी सुख अनुपम्य आहे| हे तू जाणसी काये पांडुरंगा ॥१॥
आम्हा ऐसे व्हावे तेणे ते भोगावे | नकळे स्वभावे ब्रह्मादिका ॥२॥
चतुराशिरोमणि आमुची जननी | जाणे ते रुक्मिणी जीवनकळा ॥३॥
चरणींचा प्रभाव जाणे गौतमवधु | जेणे शापबद्ध मुक्त केली ॥४॥
चरणींचा स्वभाव जाणती वैष्णव | नल कुबेर मुनिसुग्रीव सखे माझे ॥५॥
नामा म्हणे तुझे चरणींची त्रिपथा | भूषण उमाकांता ऐसे जाले ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग