वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकरी परत आल्या नं

🙏 3. संत तुकाराम · ABH-079813 · अभंग क्र. ३६०१

3601.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
आजी बरवे झाले । माझे माहेर भेटले ॥१॥
डोळा देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥धृपद॥
धन्य झालो आता । क्षेम देऊनिया संता ॥२॥
इच्छेचे पावलो । तुका म्हणे धन्य झालो ॥३॥

अर्थ :
आज खूप चांगले झाले संतांच्या रुपाने मला माझे माहेर म्हणजे आईबापच भेटले. आज मी माझ्या डोळयाने संतसज्जन पाहिले त्यामुळे माझा सर्व भाग व शीण निवारण झाला आहे. संतांना क्षेम आलिंगन देऊन मी आता धन्य झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, इच्छेप्रमाणे सर्व मला प्राप्त झाले त्यामुळे मी धन्य झालो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग