वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकरी परत आल्या नं

🙏 3. संत तुकाराम · ABH-079380 · अभंग क्र. ३६०२

3602.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
वोरसोनि येती । वत्स धेनुवेच्या चित्ती ॥१॥
माझा करावा सांभाळ । वोरसोनिया कृपाळ ॥धृपद॥
स्नेह भूक तहान । विसरती झाले क्षीण ॥२॥
तुका म्हणे कौतुके । दिले प्रेमाचे भातुके ॥३॥

अर्थ :
गाईच्या चित्तामध्ये नेहमी तिचे वासरु असते त्यामुळे ती तिचा पान्हा घेऊन वासराकडे जाते. त्याप्रमाणे हे संतजनहो तुम्ही देखील माझ्याकडे स्वत: येऊन माझा सांभाळ करा तुमचा प्रेमरुपी पान्हा पाजून माझा सांभाळ करा. तुमच्या प्रेमाने तहान भूक विसरुन जाते एवढेच नाही तर झालेला त्रासही विसरुन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, हे संतजनहो तुम्ही मला कौतुकाने तुमचा प्रेमरुपी खाऊ दिलेला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग