वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(आरत्या)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079806 · अभंग क्र. ४०८२

4082.
(आरत्या)
काय तुझा महिमा वर्णु मी किती । नामे मात्रे भवपाश तुटती ।
पाहाता पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळा सहित जडजीव उद्धरती ॥१॥
जय देव जय देव जय पंढरिराया, श्रीपंढरिराया । करुनिया कुरवंडी सांडीन काया ॥धृपद॥
मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाही उपमा ।
श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥२॥
धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी ।
विष्णूचे पूजन एकाभावेंसी । नित्यमुक्त पूज्य तिही लोकांसी ॥३॥
न वजे वाया काळ जे तुज ध्याती । अखंड तुझा वास तयांच्या चित्ती ।
धाले सुखे सदा प्रेमे डुल्लती । तीर्थे मलीन वास तयांचा पाहाती ॥४॥
देव भक्ती तूचि झालासी दोन्ही । वाढावया सुख भक्ती हे जनी ।
जड जीवा उद्धार व्हावया लागोनी । शरण तुका वंदी पाउले दोन्ही ॥५॥

अर्थ :
देवा तुझा महिमा मी काय आणि किती वर्ण करू तुझे नाम घेतले तरी भवपाश तुटतात. विष्णूच्या मूर्तीची पाऊले पाहिले असता जड जीवासहीत कोटीकुळाचा उध्दार होतो. हे पंढरीराया तुझा त्रिवार जयजयकार असो. मी माझ्या देहाची कुरवंडी करुन तुझ्यावरुन ओवाळून टाकीन. देवा तुझ्या मंगल आरतीचा थोर महिमा आहे त्याला देण्यासाठी दुसरी कोणतीही उपमा नाही. देवा तुझी मंगल आरती जो कोणी तुझ्या श्रीमुखासहीत पाहतो तो जसे सूर्य उगवल्यानंतर अंधकार नाहीसे होतो तसा त्याच्या सर्व कर्मबंधनाचा नाश होते. एकादशी हे व्रत आणि हा काळ अतिशय धन्य आहे आणि ज्याला कोणाला त्या दिवशी हरीजागरण आणि उपवास घडेल, आणि ज्याच्या हातून त्या दिवशी विष्णूचे एकनिष्ठ भक्तिभावाने पूजा घडते तो त्रैलोक्यात नित्य मुक्त असून स

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग