वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(आरत्या)

🙏 3. संत तुकाराम · ABH-079706 · अभंग क्र. ४०८१

4081.
(आरत्या)
दैत्यभारे पीडिली पृथ्वी बाळा । म्हणोनि तूज येणे झाले गोपाळा ।
भक्तीप्रतिपाळक उत्सव सोहंळा । मंगळे तुज गाती आबळ बाळा ॥१॥
जय देव जय देव जय गरुडध्वजा । आरती ओवाळू तुज भक्तीकाजा ॥धृपद॥
गुण रूप नाम नाही जयासी । चिंतितांची तैसा होसी तयांसी ।
मत्स्य कूर्म वराह नरसिंह झालासी । असुरा काळ मुणि ठाके ध्यानासी ॥२॥
सहस्त्र रूपे नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती म्हणती तुज विश्वंभरा ।
जीवना जीवन तूचि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिका सुरवरा ॥३॥
संता महंता घरी म्हणवी म्हणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा ।
सुदर्शन घरटी फिरे अवसरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥४॥
भावेविण तुझे न घडे पूजन । सकळ ही गंगा झाल्या तुजपासून ।
उत्पत्ती प्रलय तूच करिसी पालन । धरूनि राहिला तुका निश्चये चरण ॥५॥

अर्थ :
हे गोपाळा दैत्यभाराने तुझी पृथ्वीरुपी कन्या अतिशय पीडित झाली त्यामुळे तर तुला अवतार धारण करावा लागला हे देवा तू भक्तप्रतिपालक असून तुझा जन्म गोकुळात झाला तो दिवस त्यांच्यासाठी उत्सव सोहंळयाप्रमाणे असून तेथील स्त्रिया तुझे मंगलगीत गात आहेत. हे गरुडध्वजा तुझा त्रिवार जयजयकार असो भक्तांचे कार्य करणा-या तुझी आम्ही आरती ओवाळू ज्या हरीला गुण, रुप, नाम नाही त्या हरीचे चिंतन फक्त ज्या पध्दतीने करतो त्या पध्दतीनुसार तो हरीरुप धारण करतो. देवा तू मस्य, कूर्म, वराह, नरसिंह झाला असून असुरांचा तू काळ आहेस व मुनीजणांच्या ध्यानात तू राहतोस हे विश्वंभरा देवा तुझे सारासार रुप व नाम असून तू सावळाही नाहीस आणि गोराही नाहीस आणि तुझ्याविषयी श्रृती नेती नेती असे म्हणत

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग