वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

शब्दांचीया रत्ने करू

🙏 3. संत तुकाराम · ABH-079803 · अभंग क्र. ४००४

4004.
शब्दांचीया रत्ने करूनी अलंकार । तेणे विश्वंभर पूजियेला ॥१॥
भावाच्या उपचारे करूनि भोजन । तेणे नारायण जेवविला ॥धृपद॥
संसारा हाती दिले आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिले ॥२॥
रंगली इंद्रिये सुरंग तांबूले । माथा तुळसीदळ समर्पिले ॥३॥
एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचे या ॥४॥
न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविले देवा माजघरी ॥५॥

अर्थ :
भक्ति, ज्ञान, वैराग्यरुपी, शब्दरुपी रत्नांचे अलंकार करुन त्यानेच मी विश्वंभराला पूजले आहे. नवविधा भक्तिभावाच्या उपचाराने मी भोजन तयार केले आणि नारायणाला ते भोजन मी जेवु घातले. माझे सर्व इंद्रिय हरीच्या रंगात रंगून गेले आणि त्याच इंद्रियांचे मी सुगंधीत तांबूल म्हणजे विडा तयार करुन हरीला अर्पण केला आणि माथ्यावर तुळशीदळ समर्पण केले. एका भक्तिभावाची निरांजनी करुन त्यामध्ये ज्ञानरूपी दिवा लावून देवाला ओवाळले आणि देवाला बसण्यासाठी देहाचे आसन मी दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी काहीही न बोलता आता देवाची चरणसेवा करीत आहे आणि देवाला मी माझ्या हृदयरुपी माजघरात निजविले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग