वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

पावला प्रसाद आता उठो

🙏 3. संत तुकाराम · ABH-079615 · अभंग क्र. ४००३

4003.
पावला प्रसाद आता उठोनि जावे । आपुलाले श्रम कळो येताती भावे ॥१॥
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥धृपद॥
तुम्हासि जागवू आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष हारावया पीडा ॥२॥
तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन । नाही निवडिले आम्हा आपणा भिन्न ॥३॥

अर्थ :
देवा आम्हाला आता तुमच्या कृपेचा प्रसाद मिळाला आहे त्यामुळे आम्ही आता उठून जावे हेच चांगले आपण आमच्यासाठी जे श्रम घेतले त्यावरुनच आमच्याविषयी तुमचा असलेला भाव आम्हाला कळून आलेला आहे त्यामुळे तुम्ही आता निद्रा करावी. आता आमचे मनोरथ सर्व पुर्ण झाले आहे त्यामुळे आम्ही आमच्या स्थळाला जातो म्हणूनच हे स्वामी गोपाळा तुम्ही आता सुखाने निद्रा करा. देवा शुभ, अशुभ कर्मे, दोष आणि आमच्या जन्ममरणाच्या पीडा तुम्ही निवारण कराव्यात याच कारणासाठी आम्ही तुम्हाला जागवत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही भोजन केले आणि त्यातील उच्चिष्ट राहिलेले प्रसाद आम्हाला सेवन करण्यास दिला व तुमच्यात व आमच्यात भिन्नत्व राहू दिले नाही आम्हाला तुम्ही तुमच्यापासून वेगळे मानले नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग