वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

लव निमिष म्हणता आहे

🙏 4. संत नामदेव · ABH-082312 · अभंग क्र. १९१५

1915.
लव निमिष म्हणता आहे नाही पाहता | क्षण एक संपादिता विषयो हा ॥१॥
स्वहित ते आचरा हित ते विचारा नामी भाव धरा जाणतेनो ॥२॥
संपत्तीचे वळे एक जाले आंधळे | वेढिले कळिकाळे स्मरण नाही ॥३॥
एक विद्यावंत जातीचा अभिमान | ते नेले तमोगुणे रसातळा ॥४॥
मिथ्या मायामोह करूनि हव्यास | वेंचिले आयुष्य वायांविण ॥५॥
नामा म्हणे कृपा करूनि ऐशा जीवा | सोडवी केशवा मायबापा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग