वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

देह पडे तोंवरी देहाच

🙏 4. संत नामदेव · ABH-082306 · अभंग क्र. १९१६

1916.
देह पडे तोंवरी देहाचा अभिमान | न करी मी अज्ञान आत्महित ॥१॥
मी माझे म्हणता गेले नेणो किती | रंक चक्रवर्ती असंख्यात ॥२॥
क्षणक्षणा देहींचे आयुष्य झडे | वासना ते वाढे नित्य नवी ॥३॥
मोहाची खाणोरी मिळाली चोरटी | खाऊनि शेवटी घर घेती ॥४॥
जंववरी संपत्ति तंववरी हे सखे | गेलिया ते भुंके सुणे जैसे ॥५॥
नामा म्हणे केशवा मी वो तुझा दास | मज आहे विश्वास तुझे नामी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग