विषयांचे गोड का करिस
1914.
विषयांचे गोड का करिसी कोड | होईल तुज जाड इंद्रियबाधा ॥१॥
सर्व हे लटिके जाण तू बा निके | रामेंविण एके न सुटिजे ॥२॥
मायाजाळमोहो इंद्रियांचा रोहो | परि न धरिसी भावो भजनपये ॥३॥
नामा म्हणे देवा करी तू लवलाहो | मयुराचा टाहो धन गजे ॥४॥
