वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 1. रविवारचे अभंग

वडाच्या पानी एक उभवि

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073672 · अभंग क्र. १०

10.
वडाच्या पानी एक उभविले देऊळ आधी कळसु मग पाया हो ।
देव पुजू गेलो तंव देऊळ उडाले पान नाही तेथे वडु रे ॥१॥
चेत जाणा तुम्ही चेत जाणा । टिपरी वडाच्या साई हो ॥२॥
पाषाणाचा देवो पाषाणाचा भत्कु पोहती मृगजळ डोही हो ।
वांझेचा पुत्र एक पोहो लागला तो तारी देव भत्का हो ॥३॥
भवाब्धिसागर नुतरवे ते पडिले रोहिणी डोही हो ।
न सापडे आत्मा बुडाले संदेही ते गुंतले मायाजळी हो ॥४॥
विरुळा जाणे पोहते खुणे केला मायेसी उपावो हो ।
बापरखुमादेविवरु विठ्ठल विसावा तेणे नेले पैल थडी वो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग