वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(श्री ज्ञानेश्वर महा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080806 · अभंग क्र. ३३९०

3390.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
नाही देवापाशी मोक्षाचे गांठोळे । आणूनि निराळे द्यावे हाती ॥१॥
इंद्रियांचा जय साधुनिया मन । ‍निर्विषय कारण असे तेथे ॥धृपद॥
उवपास पारणी अक्षरांची आटी । सत्कर्मा शेवटी असे फळ ॥२॥
आदरे संकल्प वारी अतिशय । सहज ते काय दुःख जाण ॥३॥
स्वप्नींचिया घाये विळवसी वाया । रडे रडतियासवे मिथ्या ॥४॥
तुका म्हणे फळ आहे मूळापाशी । शरण देवासी जाय वेगी ॥५॥

अर्थ :
देवाजवळ मोक्षाचे गाठोडे नाही की ते देवाने तुझ्या हातामध्ये आणून दयावे. इंद्रियांवर विजय मिळवून मनाला निर्विषय कर तरच मोक्षाची प्राप्ती होईल. उपवास म्हणजे एकादशी सोमवार हे व्रते करणे नंतर पारणे सोडणे त्यानंतर वेदशास्त्राचा अभ्यास करणे आणि सत्कर्म करणे याचे तुला शेवटी मोक्षरुपी फळ मिळेल. संसारामध्ये तू अनेक प्रकारचे संकल्प करतोस ते संकल्प करणे सोडून दे दुराग्रह म्हणजे अभिमानपणा सोडून दे असे केल्याने तुला सहजस्थिती प्राप्त होईल व सहजस्थिती प्राप्त झाली की मग तुला दु:ख जाणवणार नाही. स्वप्नामध्ये तुझ्यावर कोणी घाव केला तर तू विनाकारणच तळमळ करतोस कारण हे घाव खोटे आहे हे तू जाणतच नाहीस आणि मनुष्य रडू लागला की त्याच्याबरोबरही तू व्यर्थ रडत बसतोस. तुकाराम महाराज म्हणतात, तुला मी वरती जे काही साधने सांगितली आहेत ते मूळ आहे आणि त्या मुळाजवळच तुला इच्छित असलेले फळ देखील आहे त्यामुळे मी सांगितलेले साधने

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग