वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(श्री ज्ञानेश्वर महा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080918 · अभंग क्र. ३३९१

3391.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
त्याजिले भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥१॥
आळवावे देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करी ॥धृपद॥
नाही जावे यावे दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरीचा ॥२॥
तुका म्हणे हा तो आहे कृपासिंधु । तोडी भवबंधु तात्काळिक ॥३॥

अर्थ :
बाहेर लोकांना सांगावे की मी संसाराचा त्याग केला आणि अंत:करणामध्ये संसाराविषयी वासना ठेवावी त्यामुळे शेवटी होते काय तर पुन्हा संसारात येऊन पडावेच लागते मग असे केल्याने काय उपयोग होणार आहे ? देवाला करुणा भाकून सतत आळवत राहावे आणि त्याविषयी मनाला साक्षी करावे देवाची प्राप्ती करुन घेण्यासाठी कोठेही दूर यावे जावे लागत नाही तो आपल्या अंत:करणामध्ये साक्षीभूत रुपाने आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव कृपासिंधू आहे त्याला करुणा भाकली की तात्काळ भवबंध तोडून टाकतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग