(व्यभिचारिणी स्त्रीच
3422.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबे ॥१॥
सांडूनि लौकिक झालिये उदास । नाही भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइके वचन बोलता या लोका । म्हणे झाले तुका हरीरत ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात), लोकांनी वाळीत टाको, व्याभिचारीण म्हणो परंतू या वनमाळिला मी कधीही विसरणार नाही. ती कृष्ण रूपामध्ये तल्लीन झालेली बुद्धी पुढे म्हणते की मी आता लोकलौकिक टाकून संपूर्णपणे उदास झाले आहे मला कोणाचे भय किंवा माझ्या जीवित्वाची अपेक्षा राहिली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला कोणीही बोलो लोक मला काहीही म्हणोत माझ्या बुध्दीला त्याविषयी काहीही वाटणार नाही कारण माझी बुध्दी आता हरीरत झाली आहे.
