(छ. शिवाजी महाराजांन
3421.
(छ. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नेण्याकरता घोडाकारकून अबदागिरी पाठविली त्यावेळी कारकुणा बरोबर पाठविलेला निरोप)
आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ॥१॥
तुमचे येर वित्त धन । ते मज मृत्तिकेसमान ॥धृपद॥
कंठी मिरावा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥
म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ॥३॥
अर्थ :
हे शिवराय तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल असे म्हणा आम्ही त्यायोगाने सुखी होऊ. तुमचे वित्त, धन हे आम्हाला मातीच्या समान आहे. कंठामध्ये तुळशीची माळ घाला व त्याचे भूषण सर्वत्र मिरवा आणि एकादशी सारखे पवित्र व्रत करा. तुकाराम महाराज म्हणतात, स्वत:ला मी हरीदास आहे असे म्हणून घ्या एवढीच एक अपेक्षा मला तुमच्यापासून आहे.
