मातेचे बाळक पित्याचे
210.
मातेचे बाळक पित्याचे जनक । गोत हे सम्यक हरि आम्हा ॥१॥
मुकुंद केशव हाचि नित्य भाव । हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥२॥
पूर्वज परंपरा ते धन अपारा । दिनाचा सोयिरा केशिराज ॥३॥
निवृत्तीचे गोत कृष्ण नामे तृप्त । आनंदाचे चित्त कृष्णनामे ॥४॥
अर्थ:
पिता मुलांचा जन्म देणारा व माता त्या बालकाचे पालनपोषण करणारी असते ती दोघ ही हरिरुप असुन सर्व गोत्रज आम्हाला हरिरुपच भासतात. मुकुंद, केशव जरी म्हंटले तरी तो आम्हाला हरिरुपच आहे. त्याच हरिरुपात तो कृष्ण म्हणुन ही दिसतो.आमच्या पुर्वजांची परंपरा हेच आमचे अपार धन असुन केशीराजाचे चिंतन हीच आमची परंपरा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, कृष्णनामाने तृप्त झालेले आमचे गोत्रज आहेत त्यामुळे कृष्णनामाचा आनंद चित्तात भरुन उरला आहे.
