विश्रामीचा श्रम आश्र
211.
विश्रामीचा श्रम आश्रम पै नेम । जप हा परम आत्मलिंगी ॥१॥
निवृत्ति घन दाट कृष्णरूपे आम्हा । अखंड पूर्णिमा नंदाघरी ॥२॥
निवृत्तिचित्ताची गेली लगबग । केला अनुराग कृष्णरूपी ॥३॥
निवृत्ति धारणा कृष्णनाम सार । सर्वत्र आचार हरिहरि ॥४॥
अर्थ:
ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास ह्या चारी आश्रमात झालेला श्रम आत्मलिंगाच्या जपाने निवृत होतो व शाश्वत आराम प्राप्त होतो.मला ते आत्मलिंग सर्वत्र कृष्णरुपाने ओतप्रोत भरल्याचे दिसत आहे. जसा पौर्णिमेच्या पूर्णचंद्रासारखा त्याच्या उदय नंदाघरी झाला आहे. त्याला तशा रुपात पाहण्याने माझ्या चित्ताची लगबग निवृत झाली व ता कृष्णरुपाचा मी अनुराग केला. निवृत्तिनाथ म्हणतात, ते कृष्णनामाची धारणा मला झाल्यामुळे तो हरिरुपाने सर्वत्र मला जाणवत आहे.
