वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

सौजन्य समाधान सर्व ज

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090025 · अभंग क्र. २०९

209.
सौजन्य समाधान सर्व जनार्दन । आम्हा रूपे धन इतुके पुरे ॥१॥
गोपाळ माधव कृष्णरूपे सर्व । ब्रह्मपद देव सकळ आम्हा ॥२॥
द्वैतभाव भावो अद्वैत उपावो । सर्व ब्रह्म देवो एक ध्यावो ॥३॥
निवृत्तीचा भावो सर्व आत्मा रावो । हरि हा अनुभवो वेदमते ॥४॥

अर्थ:
जगतातील सर्व रुपे आम्ही जनार्दन रुपातच पाहतो त्यामुळे आम्हाला समाधान लाभते व सर्वांबरोबर आम्ही सौजन्याने पाहतो हेच आमचे धन पुरेसे आहे. कधी तो गोपाळ तर की माधव तर कधी कृष्ण होतो पण आम्ही त्याच्यात ब्रह्मपणच पाहातो. आमच्या द्वैतभावाचा पूर्ण निरास होऊन आम्ही अद्वैतात त्याला एकत्वाने ब्रह्मस्वरुपात जाणतो. निवृत्तिनाथ म्हणतात, माझा भाव त्याच्याशी एकरुप झाल्याने तो आत्माराम सर्वत्र एकरुपात मी पाहतो व वेदांचा ही त्या हरिरुपाबद्दलच तेच मत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग