जोडोनिया हात वंदिला
579.
जोडोनिया हात वंदिला कृतांत| म्हणे माझा हेत इतुकाची ॥१॥
सर्व सुखाहुनि हेंचि बाटे गोड| संसाराची ओढ मोडवेना ॥२॥
मृग पक्षीयाचे कळावे बोलणें| सर्व कांही येणे कार्यसिद्धी ॥३॥
इतुकी आहे हो माझी ही वासना | पुरवुनि स्वस्थाना जाये तुम्ही ॥४॥
नामा म्हणे ज्याची जे कांही वासना| तेचि पुढे जाणा उभी ठाके ॥५॥
