वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

देऊनिया वर दंडपाणी ग

🙏 4. संत नामदेव · ABH-083634 · अभंग क्र. ५८०

580.
देऊनिया वर दंडपाणी गेला | ध्यास पारध्याला मृगाचाची ॥१॥
लाऊनिया चित्त ऐके चळवळ | दृष्टीची तळमळ लक्ष तेथे ॥२॥
उगवला दिन जाहला प्रकाश | मृग पक्षीयास दृष्टि जाली ॥३॥
तोचि मृग पाहा आला उदकासी | उड्डाण गगनासी साधीतसे ॥४॥
तृषाक्रांत मोठा चालिला निःसंग| प्रारब्धाचा भोग ओढवला ॥५॥
उदकाचिये हांवे दृष्टि जाली दुरी| पाश तो सामोरी देखेचिना ॥६॥
येऊनिया पडे जाळिया माझारीं| लोळे पृथ्वीवरी एकसरा ॥७॥
नामा म्हणे भिल्ले पाहाता लोचनी | वोढोनिया गुणी बाण लावी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग