जाणोनिया यम संतोषला
578.
जाणोनिया यम संतोषला मनी| मंजुळ वचनी काय बोले ॥१॥
केली देवे कृपा पाठविले मज| वरदान तुज द्यावयासी ॥२॥
सर्वही जीवांचा नियंता मी यम | इच्छिसी तो काम पूर्ण करू |॥३॥
शिवरात्री आजी उपवास केला| शंकर तोषला बिल्वदळी ॥४॥
नामा म्हणे ऐसे ऐकता वचन | पारध्याचे मन सुखावले |॥५॥
