नये जरी तुज मधुर उत्
209.
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ॥१॥
नाही तयावीण भुकेला विठ्ठल । येई तैसा बोल रामकृष्ण ॥२॥
देवापाशी मागे आवडीची भक्ति । विश्वासेंशी प्रीती भावबळे ॥३॥
तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्घार दिसेंदिस ॥४॥
