जुंझायाच्या गोष्टी ऐ
208.
जुंझायाच्या गोष्टी ऐकतांची सुख । करिता देहृदुःख थोर आहे ॥१॥
तैसी हरिभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो वळी विरला शूर ॥२॥
पिंड पोसलिया विषयांचा पाईक । वैकुंठ नायक कैचा तेथे ॥३॥
तुका म्हणे व्हावे देहासी उदार । रखुमादेवीवर जोडावया ॥४॥
