दीपाचेनि तेजे पैस घे
650.
दीपाचेनि तेजे पैस घेतसे माया ।
जाय सांगावया व्दैतभावो ॥१॥
द्वैत नाही अद्वैत नाही ।
ठायींच्या ठायी कतत्त्वी ॥२॥
तैसे रसमय तेज स्नेहार्णव बीज ।
छाया मोहबीज न बिंबत ॥३॥
बापरखुमादेविवरू वोतली ये कळा ।
न दिसोनी सोंविळा दिसे हरि ॥४॥
अर्थ :
परमात्मस्वरूप दीपाचे प्रकाशाने सर्वत्र व्याप्ति केली आहे. हे सांगावयाला द्वैत पत्करावे लागते. वस्तुतः त्याचे ठिकाणी द्वैत किंवा अद्वैत भाव काहीच नाही. तो आपलेच ठिकाणी स्वगतादिभेद शून्य एकरूप आहे. ते आनंदस्वरूप आनंदाचे तेजोमय परमात्मजीवन व आभासरूप मोहाचे बीज आहे. परंतु ते कोणाला आकलन होत नाही. असे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल, तोच परमात्मा सर्व पदार्थामध्ये व्यापून कोणाला न दिसता असंगरूपाने सोवळा आहे. असे माऊली सांगतात.
