वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ४. गौळणी

नित्यानंदा पुढे आनंद

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089805 · अभंग क्र. १७३

173.
नित्यानंदा पुढे आनंद तो कोण ।
विषयसुख बाई बापुडे ते क्षीण ।
जेथे न सरेची वैकुंठसदन ।
शेषशयी वो त्रिकुटभुवन वो ॥१॥
नेघो म्हणोनिया त्यागिती परौते ।
घेऊ संगसुख हरीच्या सांगाते ।
गाऊ वानू रुप पाहोनि निरुते ।
हांसो खेळो ठायी जेववू सांगाते वो ॥२॥
नेघो समाधीचे सुख तुच्छ वाटे ।
नित्यनित्याचिये न पडो खटपटे ।
काय करु ते तपाचे बोभाटे ।
एका हरिविण अवघी ते फलकटे वो ॥३॥
काय जाऊनिया करु निजधामा ।
तेथे मी नातुडे नाडळे विश्रामा ।
येथे सांडूनिया तमालमेघ:शामा ।
नेघो नाईका आणिका दुर्गमा वो ॥४॥
स्वर्गभोग तेही न लागती असार ।
क्षणे होती जाती क्षणेंचि नैश्वर ।
येथे हरिसंगे क्रीडो निरंतर ।
सर्वही सुखांचे हा जोडला आगर वो ॥५॥
निळा म्हणे नित्य नि:सीम स्वानुभवे ।
ऐशा गोपिका त्या रंगल्या हरिसवे ।
अधिकाधिक् हे प्रेम त्यांचे नवे ।
जाणोनि आवडी ते पुरविली देवे वो ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग