कंसाचे कारागृही आगमन
38.
कंसाचे कारागृही आगमन मायेची सुटका आणि वसुदेव देवकीची बंधमुक्तता.
तांतडीने जाती । कंसा सेवक सांगती ॥१॥
उपजला वैरी । त्यासी तू रे त्वरे मारी ॥२॥
त्वरे धांव घाली । पाहे कन्या उप-जली ॥३॥
ज्याचा धोका तूज । नव्हे कन्या द्यावी मज ॥४॥
मारायाशी खड्ग घाली । हातिंची सुटूनिया गेली ॥५॥
तुजलागी वधी । उपजला मज आधी ॥६॥
सांगे ब्रह्मज्ञान । देवकीचे समा-धान ॥७॥
नामा ह्मणे तयेवेळी ॥ त्यांची बंधने काढिली ॥८॥
