अकार उकार मकारांपरता
500.
अकार उकार मकारांपरता सर्वेश्वर । कटी धरुनी कर उभा विटे ॥१॥
नीरा भीवरा संगम पुंडलीक मुनी । नारद वेणुनाद ऐसेंस्थळ लक्षुनी ॥२॥
योगियां हृदयींचे ठेवणें गोमटे । जोडले उद्भटे पुंडलीका ॥३॥
आषाढी कार्तिकी आनंद सोहळा । संताचा मेळा घनवट ॥४॥
एका जनार्दनी जनार्दन एकपणीं । त्रैलोक्यांचा धनी विटेवरी ॥५॥
