परात्पर परिपुर्ण सच्
501.
परात्पर परिपुर्ण सच्चिदानंदघन ।
सर्वा अधिष्ठान दैवतांचें गे माय ॥१॥
ते लाधले लाधले पुंडलिकाचे प्रीती ।
येत पंढरीप्रती अनायासें गे माया ॥२॥
जगडंबर पसारा लपवोनि सारा गे माय ।
धरियेला थारा पुंडलिकाचेनि प्रेमे गे माय ॥३॥
ओहंअ मां न कळे कांही सोहं देती ग्वाहीं गे माय ।
कोहमाची तुटली बुंथी एका जनार्दनी प्रीति गे माय ॥४॥
