अकार तो अकारु मकार त
499.
अकार तो अकारु मकार तो मकारु । उकाराचा पालाऊ शोभे गे माय ॥१॥
आदि अंत नसे ज्या रुपा वेगळें । ते कैसे वोळले पुंडलिका गे माय ॥२॥
वेद उपरमला पुराणे कुंठीत । शास्त्रांची मती नेणत तया सुखा गे माय ॥३॥
जाणते नेणते सर्व वेडावले । ठकलेचि ठेले सांगु काय गे माय ॥४॥
या पुंडलिकें वेडविलें चालवुनि गोविले । एका जनार्दनी उभे केले विटेवरी गे माय ॥५॥
