आदिनाथ उमा बीज प्रगट
384.
आदिनाथ उमा बीज प्रगटले ।
मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ॥१॥
तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ॥२॥
वैराग्ये तापला सप्रेमे निवाला ।
ठेवा जो लाधला शांतीसुख ॥३॥
निर्व्दंव्द नि:शंख विचारिता मही ।
सुखानंद हृदयी स्थिरावला ॥४॥
विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख ।
देऊनी सम्यक अनन्यता ॥५॥
निवृत्ती ये गहिनी कृपा केली पूर्ण ।
कुळ हे पावन कृष्ण नामे ॥६॥
तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गहिनीनाथा ॥२॥
