नाशिवंतासाठी करितोसी
201.
नाशिवंतासाठी करितोसी आटी । दृढ धरा कंठी एक नाम ॥१॥
भवासी तारक विठ्ठलची एक । नाही आणिक सुख येता जाता ॥२॥
एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेही थारा तईच लाभे॥ ॥३॥
चोखा म्हणे येथे एकचि साधन । संतासी शरण जाई सुखे ॥४॥