वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080800 · अभंग क्र. ३४३७

3437.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
आजिवरी तुम्हा आम्हा नेणपणे । कौतुके खेळणे संग होता ॥१॥
आता अनावर झालो अगुणाची । करू नये तेचि करु सुखे ॥२॥
तुका म्हणे आता बुडविली दोन्ही । कुळे एक मनी नारायण ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)अहो सासुरवाशीणी बयांनो आजवर आपण अज्ञानामध्ये संसाराचा खेळ एकमेकांसोबत कौतुकाने खेळत होतो. आता आम्ही त्रिगुणरहित झालो आहोत त्यामुळे अनावर म्हणजे मुक्त झालो आहोत आणि जे कोणीही करु शकत नाही ते आम्ही सुखाने करु. तुकाराम महाराज म्हणतात, मी आता आई आणि वडिल या दोन्हीही कुळाला बुडविले आहे आणि एक नारायणच मनामध्ये दृढ धरला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग