वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080898 · अभंग क्र. ३४३८

3438.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
सासुरिया वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावेचि ॥१॥
सांडवर कोणी न धरिती हाती । प्रारब्धाची गति भोगू आता ॥२॥
न व्हावी ते झाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजो आता ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)संसाररुपी पती व संसाराच्या संबंधी असलेल्या सासरच्या लोकांना व देहरुपी माहेरच्या लोकांना दोघानाही माझा वीट आला आहे. आता सर्वांनाच माझा वीट आला आहे व मलाही सर्वाचा वीट आला आहे त्यामुळे माझा कोणीही स्वीकार करणार नाही त्यामुळे प्रारब्धाची आता गती जशी असेल तशी भोगू. तुकाराम महाराज म्हणतात, नको होती तेवढी फजिती आतापर्यंत आमची झाली आहे त्यामुळे आता पुढे लाजू तरी कशासाठी ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग