(व्यभिचारिणी स्त्रीच
3436.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
सांगतो ते तुम्ही अइकावे कानी । आमुचे नाचणी नाचू नका ॥१॥
जोवरी या तुम्हा मागिलांची आस । तोवरी उदास होऊ नका ॥२॥
तुका म्हणे काय वायाविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाही ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)सासुरवासणी बयांनो मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते तुम्ही तुमच्या कानानी ऐका आम्ही हरीच्या छंदात नाचत आहोत तसे तुम्ही नाचू नका. जोपर्यंत तुम्हाला संसाराविषयी आस आहे अपेक्षा आहे तोपर्यंत तुम्ही देहावर उदास होऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जर देहावर उदास झाले नाही आणि गोविंदाची भक्ती करु लागले तर तुमची फजिती होईल तुम्हाला धड तुमचा पतीही नाही आणि गोविंदही नाही अशी तुमची फजिती होईल.
