व्रतामाजीं व्रत एकाद
3385.
व्रतामाजीं व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय ॥१॥
अष्टही प्रहर हरिकथा करी । वाचे विठ्ठल हरी वदोनियां ॥२॥
टाळ मृदंग वाजती गजरें । विठ्ठल प्रेमभरें नाचतसे ॥३॥
एका जनार्दनी व्रताचा छंद । तेणे परमानंद सुख पावे ॥४॥