प्रणव-पंढरी विस्तारल
503.
प्रणव-पंढरी विस्तारले क्षेत्र ।
अर्धमात्रा तेथ चंद्रभागा ॥१॥
बिंदू वेणुनाद अनुहत गोविंद ।
वाजवितो छंदे जाणती तो ॥२॥
अकार ते भीमा जाणते जाणती ।
दुजी पुष्पावती उकार तो ॥३॥
मकार पद्माळे अनुभव पंढरी ।
ब्रह्मसाक्षात्कारी वोतलीसे ॥४॥
विष्ठल अतीत आकारावेगळा ।
व्यापुनी राहिला पंढरीये ॥५॥
पुंदलिके तेथे अनुभव पाहिला ।
बहेणि म्हणे केला विस्तार हा ॥६॥
