ठेवुनी कर माथा उपदेस
502.
ठेवुनी कर माथा उपदेसी ।
तत्वंपद प्रणवासी ॥१॥
तो म्या साठविला हृदयभुवनी ।
सद्गुरूकर वरदानी ॥२॥
मायातम नासी क्षण एके ।
निरसी शास्त्रविवेके ॥३॥
तत्सत् रूप याचे मज बोधी ।
स्वरूपी मानस रोधी ॥४॥
त्रिगुणी देह वर्ते परतंत्रे ।
बोधित पंचकयंत्रे ॥५॥
होते जीवधर्मी परदेसी ।
ते नेले मोक्षपदासी ॥६॥
तापत्रयव्यथा मज न बाधी ।
दिधली शांतिसमाधि ॥७॥
बहेणि म्हणे ऐसा गुरू दाता ।
नोसंडी जीव जाता ॥८॥
