धन्य धन्य ते पंढरी ।
504.
धन्य धन्य ते पंढरी ।
जेथे नांदतो श्रीहरी ॥१॥
धन्य धन्य चंद्रभागा ।
जेथे वृंदा हे पांडुरंगा ॥२॥
धन्य धन्य ते पद्माळ ।
जेथे राहिले गोपाळ ॥३॥
धन्य धन्य वेणुनाद ।
क्रीडा करितो गोविंद ॥४॥
धन्य धन्य वाळुवंट ।
जेथे उभा पायी वीट ॥५॥
धन्य धन्य पुंडलीक ।
हरी साधियेला देख ॥६॥
धन्य धन्य पुष्पावती ।
जेथे वृंदा हे श्रीपती ॥७॥
बहेणि म्हणे धन्य धन्य ।
पांडुरंगी जे अनन्य ॥८॥
