काय साहतोसी फुका । म
2164.
काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥१॥
रीण घराचे पागिले । ते न सुटे काही केले ॥धृपद॥
चौघांचिया मते । आधी खरे केले होते ॥२॥
तुका म्हणे यावरी । आता भीड कोण धरी ॥३॥
अर्थ :
देवा माझे सेवा रुपी धन तू तुझ्याजवळ ठेवले आणि आता फुकट माझे बोलणे का बर तु सहन करत आहेस. देवा एक लक्षात ठेव एकदा की ऋण घरात शिरले ना कि ते घराचे वाटोळे करते ते काही केल्या सुटत नसते. देवा माझे सेवा रुपी ऋण तुझ्याकडे आहे हे आपण याआधी चारचौघा संतामध्ये खरे केले होते. तुकाराम महाराज म्हणतात देवा यापुढे आता तुझी भीड कोण धरील.
