आम्ही भांडो तुजसवे ।
2163.
आम्ही भांडो तुजसवे । वर्मी धरू जाले ठावे ॥१॥
होसी सरड बेडुक । वाघ गाढ्याही पाईक ॥धृपद॥
बळ करी तया भ्यावे । पळो लागे तया घ्यावे ॥२॥
तुका म्हणे दूर परता । नर नारी ना तू भूता ॥३॥
अर्थ :
देवा आम्हाला तुझे वर्म चांगले समजले आहे त्यामुळे त्या वर्माला धरून तुझ्याशी आम्ही भांडत आहोत. देवा जसा प्रसंग असेल तसा तू होतोस सरडा, बेडूक, वाघ भित्रा किंवा एखाद्याचा पाईक देखील होतोस. जे फक्त तुझ्यावर बळजबरी करतात त्यांनाच तू भीतो आणि जे तुला भितात त्यांच्यामागे तू लागत असतो. तुकाराम महाराज म्हणतात देवा तु नर ही नाही आणि नारी ही नाहीस एवढेच काय पंच भूतान पैकी कोणीही नाहीस त्यामुळे तु सर्वांपेक्षा दूरच आहेस.
