ब्रह्मादि देवांनी के
22.
ब्रह्मादि देवांनी केलेली स्तुती.
वासुदेवा हषिकेशा माधवा मधुसूदना । करिताती स्तवना पुरुषसूक्ते ॥१॥
पद्मनाम त्रिलोकेशा वामना शेषशायी । आह्माम कोणी नाही तुजवीण ॥२॥
जनार्दना हरि श्रीवत्स गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आता आह्मा ॥३॥
वराहा पुंडरीका नृसिंह नरां-तका । वैकुंठनायका देवराया ॥४॥
अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया । कृपेच्या अभया देई आम्हा ॥५॥
नारायणा देवाध्यक्षा कैठभमंजना । करींरे मर्दना दुष्टाचिया ॥६॥
चक्रगदाशंखपाणी नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥७॥
रामा हयग्रीवा भीष्मा रौद्रा मेवाद्भवा । आश्रय भूता सर्वा तुझा असे ॥८॥
श्रीधरा श्रीपति चतुर्बाहो मेघ:शामा । लेंकुरे आम्ही आम्हाम पाव त्वरे ॥९॥
नामा म्हणे ऐसे करिता स्तवन । तोषला भगवान क्षीराब्धींत ॥१०॥
