वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

अभक्तां देव कंटाळती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086074 · अभंग क्र. १४९९

1499.
अभक्तां देव कंटाळती । परी सरते करीतीं तंव त्या ॥१॥
म्हणोनि महिमा त्यांचा जगी । वागविती अंगी सामर्थ्य ॥२॥
तंत्र मंत्रा नोहे बळ । भक्ति प्रेमळ पाहिजे ॥३॥
आगमानिगमाचा पसारा । उगाचि भारा चिंध्यांचा ॥४॥
वेदशास्त्रांची घोकणी । ती तो कहाणी जुनाट ॥५॥
पुरातन वाटा असती बहु । त्या त्या न घेऊ यामाजी ॥६॥
एका जनार्दनी सोपा मार्ग । संतसंग चोखडा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग