वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 139. शिवरात्रमाहात्म्य

ऐकताची जीव जाला कासा

🙏 4. संत नामदेव · ABH-083648 · अभंग क्र. ५८९

589.
ऐकताची जीव जाला कासावीस| म्हणे जाले कैसे अकस्मात ॥१॥
आम्हा कपाळीचा भोग वोढवला| कांत तो निघाला सांडोनिया ॥२॥
कैची बाळे कोण कोणाची सांगाती| पाहाता हे भ्रांति वा उगीची ॥३॥
ठायीची हे काया जायाची जाईल| वाचलिया फोल पतिविण ॥४॥
पतिविण सुख काय या संसारीं| दुःख कल्पवरी भोगावे की ॥५॥
नामा म्हणे ऐसे चितोनिया मनीं| आली तत्क्षणी हरणापाशी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग