येरी म्हणे काय करू व
588.
येरी म्हणे काय करू वो सुंदरी| आता आहे घरी काय माझे ॥१॥
प्राणनाथे पेणे केले त्या लोकीं| जाईन मी देखा तयासंगे |॥२॥
वडिलपणे तुम्ही लोभ असो द्यावा| सांभाळ करावा बाळकांचा ॥३॥
वागुरे माझारी गुंतलासे कांत| कायसे जीवित विचारी पा ॥४॥
न लावी उशीर जाई येच क्षणीं| अससि गभिणि पूर्ण मास ॥५॥
जरी देसी प्राण पतन गर्भासी| होय ते दोषासी पात्र होसी ॥६॥
पोसोनिया बाळे वाढवी वंशाला| द्यावे चित्त बोला माझ्या आता ॥७॥
पळावया तुज नाही अंगी बळ| न देखता खळ जाई वेगी ॥८॥
नामा म्हणे ऐसी उत्तरे ऐकिली| तेही घाबरली तये वेळी |॥९॥
