ब्रह्मादिका पाहता ठक
236.
ब्रह्मादिका पाहता ठक पडियंले । पहाहो कैवल्य गौ-ळिया जोडले ॥१॥
कोण्या ऋणे या केला नकळे । परब्रह्म आमुचे आहे सोंवळे ॥२॥
या गोकुळाचेनी पाडे पाहता । सुख वैकुंठी न दिसे सर्वथा ॥३॥
ऐसा अभिनव आनंदु जाणतो । गोकुळींचे तृण तरुवर तरी होतो ॥४॥
कामक्रोध लवियेला येणे निवे । तेणे सुखे शुद्ध लागलीसे सवे ॥५॥
नामया स्वामी ह्लदयीमचा विसांवा । आपुले सर्वस्व देऊनिया जोडावा ॥६॥
