आम्ही कोणावरी सत्त्आ
101.
आम्ही कोणावरी सत्त्आ । करावी बा पंढरीनाथा ।
होईल साहता दुजा । तत्वता तो सांगा ॥१॥
तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनी ।
देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाक णे यासाठी ॥२॥
केला माझा अंगिकार । आता का करिता अव्हेर ।
तुमचा तुम्ही साचार । करा विचार मायबापा ॥३॥
जन्मोजन्मींचा पोसणा । तुमचाचि नारायणा ।
भाकि तो करूणा । आना मना चोखा म्हणे ॥४॥
