आम्हा तो न कळे कांही
100.
आम्हा तो न कळे कांही हे विंदान । ठेविली पायी जाण डोई देवा ॥१॥
काढा जी दयाळा भवाचे हे जाळे । गुंतलोंसे बळे माया पाशी ॥२॥
हाव भरी मन करी माझे तुझे । बैसलासे वोझे माथा भार ॥३॥
चोखा म्हणे देवा अहो तुम्हा सुजाणा । तुमच्या तुम्ही मना उमजावे ॥४॥
