आले देवाजीच्या मना ।
104.
आले देवाजीच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥१॥
हरिश्र्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घारी पाणी ॥२॥
पांडवांचा साहाकारी । राज्यावरोनि केले दुरी ॥३॥
तुका म्हणे उगेचि राहा । होईल ते सहज पाहा ॥४॥