काळ सारावा चिंतने ।
103.
काळ सारावा चिंतने । एकांतवासी गंगास्नाने ।
देवाच्या पूजने । प्रदक्षिणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार ।
नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥२॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण ।
व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥३॥
देह समर्पिजे देवा । भार कांहींच न घ्यावा ।
होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥४॥
